तीर्थक्षेत्रसंत चरित्र

सदगुरु भाऊसाहेब महाराज उमदीकर जीवनप्रवास

जतचे नामवंत संस्थानीक ,उमदीचे जहागीर श्री .खंडेराव देशपांडे होते.त्त्यांच्या पत्नी भागीरथी याचे पोटी व्यंकटेश यांचा जन्म शके 1765 इ, स,1843 ला रामनवमी दिवशी झाला.व्यंकटेश यानाच आईवडील प्रेमाने भाऊराया असे म्हणत .भाऊरायांना म्हणत. भाऊरायांना दोन भाऊ होते .एक नाना साहेब हे गंभीर स्वभावाचे व दुरदृष्टी होते .दुसरे दाजीबा हे फार सरळ स्वभावाचे होते.तिघाची सदगुरु वर निष्ठा होती. मातृभाषा कन्नड असून सुद्धा मराठी शिक्षण घेण्यासाठी निंबर्गी गावी गेले.घरात भक्ती पूर्वी पासून असल्यामुळे भाऊरायांना लहान पणापासूनच भक्तीची आवड होती. ते त्यांच्या वडिलांबरोबर गुरुलिंग महाराजांच्या प्रवचनास नेहमी जात असत. गुरुलिंग महाराजांचे साधे व सुलभ अद्यत्म प्रवचन भाऊरायांना मनोमन भिनले. आपण निरर्थक जीवन जगण्यापेक्षा भक्ती करून चांगले जीवन असे भाऊरायांना वाटत. एकदा एका झाडा खाली गुरुलिंग महाराज व रघुनाथ महाराज बसले होते ,जवळच मेंढरे चरत होती, अल्लड भाऊ रायांनी त्या मेंढरांना दूर हाकलून दिले ,गुरुलिंग महाराजांचे प्रवचन ऐकण्यास भाऊरायांचे वडील जात होते त्यामुळे महाराजांना भाऊसाहेब ओळखत होते.त्यानीं ओळखले भाऊराय अत्यंत एकनिष्ठ व आत्मज्ञानी आहेतत्यानां गुरुलिंग जंगम महाराजानी रघुनाथ महाराजाणंकडून गुरु दक्षिणा दिली ,त्यावेळी त्यानां खूप आनंद झाला .गुरुलिंग महाराजांना माहित होते की भाऊरायांच्या हातून संप्रदायाचा प्रचार मोठा होईल अनेक भक्तांचा उद्धार होईल ,भाऊराव अत्यंत द्यनस्थ बसून दयनसाधना करत असत झाडाच्या फांदीवर बसून ध्यानसाधना करत असत गुरुलिंग महाराजांना ते अत्यन्त प्रिय होते त्यामुळे नाम जरी रघुनाथ महाराजांनी दिले तरी पण भाIऊसाहेब हे गुरुलींगमहाराजांना आपले गुरु मानत होते. गुरुलिंग महाराज भाऊरायांच्या वडीलांना म्हणत रामनवमीला झाला म्हणुन रामच जन्मले आहेत. भाऊराय अत्यन्त हुशार होते. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण घेतले होते .ते पहाटे काकड आरती म्हणत असत सकाळचे भजन दुपारचे भजन रात्रीचे बारा अभंग म्हणत असत, त्यामुळे त्यांना आत्मज्ञान झाले होते .चणे खावे लोखंडाचे !तेव्हा ब्रह्मपदी नाचे !या प्रमाणे भाऊसाहेब महाराजांनी 42 वर्षे तपशर्या केली. त्याची गुरुनिष्ठा अदभुत होती. त्यांना लहान वयातच बापू गोखले तात्या टोपे याची स्वतंत्र वीरांची संगत असल्याने त्यांनी देश सेवा सुद्धा चागली केली व ते लोकांना पटवून देत की देश भक्ती करून देशाला स्वतंत्र मिळाले पाहिजे .युवकांच्यात जण जागृती करत ,लोकांना त्यांनी ,जाचक रुढीतून परावृत्त केले सामान्य लोकांच्या मनात जागरूकता निर्माण केली .देवाबद्धलची मत-मतांतरे पटवून सांगितले देव जवळी जवळी अंतरी !भेट नाही जन्मरी !हे सत्यज्ञान पटवून सांगितले.पुढे त्यांना साक्षात्काराची प्रचिती अली व संप्रदाय सुद्धा वाढला. “याच देही याच डोळा पहा मुक्तीचा सोहळा”असे अनुभव येऊ लागले .पुढे सप्ताहास येणाराची संख्या वाढली लोकांची गैर सोय होऊ लागली म्हणून गुरुलिंग महाराजांच्या अस्थी तिथून काडून वडाच्या झाडाच्या उत्तरेस त्रिमुख चागल्या घडीव दगडाचाकट्टा बांधला व त्यावर शिवलिंग स्थापित केले .समाधीच्या दोन्ही बाजूस समोर अकरा खनाची साधी धब्याची इमारत बाधली .तेथे परत सप्तहा सुरु झाले ,ही परंपरा चालूच राहिली अनेक लोकांना गुरुदक्षिणा भाऊसाहेबांनी दिली, संसारात राहून परमार्थ कसा करावा याचे त्यानीं अनेकांना समजून दिले व दासबोध ,ज्ञानेश्वरी ,तुकाराम गाथा, नामदेव गाथा,ज्ञानेश्वरी हरिपाठ सर्व संताचे चरित्र्य समजावून सांगितले जात-पात धर्म-अधर्म रहित सर्व धर्म संभावना असलेला हा संप्रदाय वाढत गेला. भाऊसाहेब कायम म्हणायचे काशी पासून रामेश्वर पर्यंत व कन्याकुमारीपासून बद्रीनाथ पर्यंत संपूर्ण भारत भर फिरला तरी असा प्रकारचे अद्यत्म ज्ञानाचे ज्ञानपीठ कोठेही दिसणार नाही. पारमार्थिक शिक्षण ,ज्ञान देऊन सर्वसामान्यांना फुकट शिक्षण कोठे ही मिळत नाही .असे मोक्ष विद्यापीठ आहे.श्री गुरुदेव रानडे अबूराव महाराज ,शिवलिंग राव व कृष्णाजी पंथ यांना स्वप्नात दृष्टांत दिला।.त्यावर सर्व जण तिथे जमले त्याचा संकेत कळलयवर सर्वजण महाराजांना विनउ लागले ,अवळू लागले की ,आम्हाला सोडून इतक्यात जाऊ नका परंतु महाराजांचे नित्य नेमात खंड पडूदिला नाही .शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांना पूजा आरती व दासबोध पारायण करण्यास व नित्यनेम पार पाडण्यास लावले.आपल्या जाण्याचा संकेत न कळू देता श्री सदगुरु भाऊसाहेब महाराज म्हणाले ,राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरुलिंगजंगम महाराज की जय !श्री रघुनाथ प्रिय महाराज की जय म्हणून मोट्यांनी टाळी वाजवली व आपली प्राण ज्योत अनंतात विलीन करून घेतली. तो दिवस होता 29/1/1914 सर्व अधिकारी शिष्य मंडळी होती. अनावर दुःख झाले .सर्वजण दुःख सागरात बुडाले .
भाऊसाहेब महाराजांची समाधी श्री गुरुलिंग जंगम महाराजांच्या समाधी समोर 15 दिवसात बांधली .या दोन्ही गुरुशिस्याची समाधी समोरासमोर मध्ये मोठा भव्य सभामंडप श्री सदगुरु गिरमलेश्वर महाराज यांनी स्वखर्चांनी बाधली .गुरुपरंपरार गुरु निष्टेचे प्रतीक बनून आजही इंचगिरीस आपल्या वैभवाने भक्तांना ते बघून अत्यानंद देतात. दुःख मुक्त करून खरे सुख भक्तांना देतात अशी ही इंचगिरी .भक्तांची वैकुंठ नगरी बनून राहिली आहे. आजपर्यंत सप्ताहास चार-पाच लाख लोक येतात ,त्यांची अंघोळ ,चहा ,नष्ठा जेवणाची सोय मठातर्फे केली जाते .सर्व कार्यकामास लाईट राहायची सोय फुकट केली जाते. कोणत्याही मंदिरात पुजारी नाही आपणच ओळीत जायचे व गुरु दर्शन घेऊन यायचे अशी व्यवस्था आहे.श्री सदगुरु भाऊसाहेब महाराजांनी मठावरील भक्ती मार्गाचे कार्य सुरळीत चालावे म्हणून भक्तिभजन,नित्य पाठ व सुव्यस्था ठेवणे करिता अकरा मारुती नावाची तीन दले तयार केली .त्यांचा वेश अकरा मारुती कोरलेला एक चांदीचा बाजूबंद हाताचे व पायांचे अंगट्यात ,एकएक चांदीची अंगठी ,एक पांढरी विजार ,जाळीदार पांढरा अंगरखा ,जरीची टोपी व टोपी पडू नये म्हणून डोकीवरून गळ्यपर्यंत हातरुमाल बांधणे या स्वयंसेवक संघाची वेशभूषा तयार केली होती.श्री रामदास महाराजांनी अकरा मारुतीच्या मूर्तीची पूजा केली होती तर श्री भाऊसाहेब महाराजांनी अकरा मारुती दल तयार केले होते .एका दलात 11 मुले अशी तीन दले तेहतीस मुलांची होती .
एकदा शिष्याना प्रवचनास येण्याचे वचन दिले व तीन दिवसात महाराजांचा महार जातीचा परम शिष्य आला व त्याच दिवसाचे आमंत्रण देऊ लागला .महाराज म्हणाले ,अरे बाळ ,त्याच दिवसाचे आमंत्रण मी परवाच स्वीकारले आहे ,त्यावर तो परम शिस्य बोलला आपला माझ्या भक्तीवर विश्वास नाही का ,असे म्हणून महाराजांचे पाय धरले त्यावर महाराज म्हणाले की ,राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरुलिंग जगंम महाराज की जय व ठीक आहे येतो म्हणाले. इकडे दुसऱ्याशिष्यांनी बैलगाडी पाठवून दिली व महाराज त्या परगावी कार्यक्रम करू लागले, इकडे हा महार भक्त महाराजांची वाट पाहत बसला होता, तर महाराज घोडयावर बसून आले .महाराजांची पूजा अर्चा झाली जेवण झालेवर संद्यकाली प्रवचन व भजन झाले व महाराज परत घोड्यावर बसून आले .काही दिवसांनी श्री भाऊसाहेब महाराजांकडे हा महार भक्त आला दर्शन घेतले व सर्व शीस्य मंडलीजवल म्हणाला ,महाराज अक्षय त्रितीयेला माझे घरी आपण आलात व प्रवचन केलात ,गावातील सर्व लोक खुष झालेत .आपल्या प्रवचनावरून भाऊसाहेब स्वतः म्हणाले ,अरे बाळा मी तुझ्याकडे कधी येतो म्हणालो .मी तर दुसऱ्या गावी गेलो होतो त्यावर महार म्हणाला तुम्ही त्याच दिवशी घोड्यावरून बसून आला होता ,त्यावर व तिथला शिस्य जण म्हणाला महाराज दुसऱ्या गावी होते ते तुमच्याकडे कसे आले म्हणून सर्वांना नवल वाटले त्यावर भाऊसाहेब म्हणाले ही सर्व कृपा गुरुलिंग जँगम महाराज यांची कृपा आहे,ते म्हणाले माझ्या गुरुमाऊलींचे किती उपकार आहेत .त्याचे माझ्यावर त्यांचा कसा उतराई होऊ .त्यावर महार म्हणाला मी कसा ओळखू शकलो नाही महाराजांना मी किती पापी असे दोष देऊ लागला .
असे होते भाऊसाहेब महाराज महाराजांचे अनेक दृष्टांत आहेत,लिहील तितक कमीच आहे.अशी ही गुरु परंपरा चालूच आहे, भाऊसाहेब महाराजांचा पुण्यथीती दिवस आहे, इंचगिरी इथे अनेक भक्त जातात व त्त्यांची संख्या 4-५ लाख असते, माझं भाग्य की मी या संप्रदायाचा एक शिस्य आहे, जन्मला यावे गुरु करावा आत्मशुद्धी मिळवावी आणि परमार्थ समजून घ्यावा” हरी कृपा तब जानिये! दे मानव अवतार !गुरूकृपा तब जानिये ! तब उतारे भवपार कबिरदास.
गुरुकृपा स्रेष्ठ आहे .गुरुकृपा निर्मल भागीरथी सारखी निखळ स्वछ आहे. त्याचेच कृपे मानवाचा उद्धार होतो म्हणून गुरूकडून गुरुमंत्र घेणे अवस्यक आहे.संसारात राहून परमार्थ मार्ग धरायचा असेल तर गुरु शिवाय पर्याय नाही ,ज्ञानेश्वर माऊली सुद्धा ज्या वेळी लोक ताप देऊ लागली त्या वेळेला ज्ञानदेव म्हणाले निवृत्ती महाराजांना की आपण इथून जाऊया त्यावर निवृत्ती महाराजांनी त्यांना आत्म ज्ञान दिले ,त्यानां मिळालेले गुरु ज्ञान त्यानीं ज्ञानदेवांना दिले ,तेव्हा ज्ञानदेवांना आत्म प्रचिती झाली व तिथेच राहून लोकांना देवाबद्दलची खरी भक्ती ओळखून दिली ,नामाचा महिमा त्यानीं सर्वांना पटवून दिला.असा महान गुरू असतो, हे अत्यन्त विलक्षण उदाहरण आहे गुरु भक्तीचे .

सचिन खुस्पे

नवी मुंबई/सातारा शिक्षण: B.Sc (Computer Science) Masters in Computer Application (MCA)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button