श्री भाऊसाहेब महाराजांचे पट्टशिष्य अंबुराव महाराज.

इ.स. १८९२ च्या चैत्रशुद्ध पौर्णिमेला भाऊराव एका ओढ्याकाठीएका मोठ्या शिळेवर बसले होते, तंबाखू खात ! अंबुराव हा कोवळातरुण पायी चालत निंबरगीच्या मारुतीच्या दर्शनाला येत होता. सद्गुरुंनी स्वतःहून हाक मारली. बाळा इकडे ये ! मी तुला नाम देतो ! घेतोस ना?अंबुराव घाबरून गेला. निंबरगी संप्रदायाची नियमावली कडक ‘नेम’ मलाकसे जमेल? असे त्यांना वाटले. तो विचार जाणून भाऊराव म्हणाले, ‘तूफक्त नाम घे, बाकी तुझ्या अडचणी मी दूर करेन. तुझी पथ्ये सांभाळूनघेण्याची जबाबदारी माझी ! उमदीकर या सद्गुरुंकडून नाममंत्र घेतलाआणि कडक नामसाधना करून भाऊरावांचे पट्टशिष्य ठरले. जसा समर्थाचा कल्याण ! अंबुराव सद्गुरुंचे बोल सांगतात. साधकाने भीम व्हावे. नामस्मरणरूपी अन्न भरपूर खाऊन कल्पनारूपी बकासुराचा नायनाट करावा. मृत्यूपूर्वीकाही क्षण ते म्हणाले, ‘आम्हाला काही इच्छाच नाही. वासना पूर्ण जळाल्याआहेत. आता आम्ही नारायण नारायण म्हणत स्वर्गात उडून जाणार !’हरिनाम सार । हरिनाम सार । तेणेची भवपार पावसील | स्वामी म्हणेअंती हरिनाम एक । तारील निःशंक तुजलागी ।याची प्रत्यक्ष अनुभूती सद्गुरु कृपेने घेतलेले अंबुराव हे एक महान शिष्यहोते…